
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश - Raksha Bandhan Wishes In Marathi
रक्षाबंधन कोट्स मराठी | Raksha Bandhan Quotes In Marathi |रक्षाबंधनाच्या शुभेच्छा | Raksha Bandhan Wishes In Marathi| राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Chya hardik shubhechha
श्रावण महिना अतिशय खास मानला जातो कारण या महिण्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे होवू लागतात. या महिन्यापासून अनेक उपवास सुरू होतात जसे की श्रावण सोमवार , मंगळागौरी, आणि श्रावण शुक्रवार तसेच विविध सण ही साजरे केले जातात जसे की रक्षा बंधन (राखी पौर्णिमा), श्नीकृष्ण जन्माष्टमी , गोपाळकाला इ.या पोस्ट मध्ये आम्ही मराठीमध्ये रक्षाबंधन कोट्स मराठी , Raksha Bandhan Quotes In Marathi , रक्षाबंधनाच्या शुभेच्छा , Raksha Bandhan Wishes In Marathi , रक्षाबंधन शुभेच्छा संदेश , Raksha Bandhan Messages In Marathi, जे तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणी ला पाठवू शकाल.
"ओवाळिते भाऊराया…. वेड्या बहिणीची वेडी हि माया…" रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. बहिण भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी भाऊ आपल्या प्रिय बहिणीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतो आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. राखीचा धागा भाऊ आणि बहिणीचे हे पवित्र नाते दृढ करण्याचे काम करतो. भाऊ-बहिणीचे नाते जगातील सर्वात सुंदर नाते मानले जाते. भावा-बहिणींमध्ये अनेकदा गोड भांडण आणि खूप प्रेम लपलेले असते. बालपणाच्या अनेक आंबट आणि गोड आठवणी नेहमी त्याच्याशी जोडलेल्या असतात.
तुम्ही राखीच्या पवित्र सणाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर पोस्टमध्ये दिलेले कोट्स, संदेश, स्टेटस आदि शेअर करून हा सण अधिक खास बनवू शकता. तुम्ही भाऊ आणि बहिणींना रक्षाबंधन कोट्स मराठी , Raksha Bandhan Quotes In Marathi , रक्षाबंधनाच्या शुभेच्छा , Raksha Bandhan Wishes In Marathi , रक्षाबंधन शुभेच्छा संदेश , Raksha Bandhan Messages In Marathi, देऊ शकता तसेच या रक्षाबंधन स्टेटस , Raksha Bandhan Status In Marathi , आणि रक्षाबंधनाचे सुंदर विचार , Raksha Bandhan Thoughts In Marathi संदेशांद्वारे तुमच्या भाऊ आणि बहिणीबद्दल तुमचे प्रेम आणि भावना व्यक्त करू शकता.
रक्षाबंधन कोट्स मराठी ( Raksha Bandhan Quotes In Marathi )
तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो,
कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी
तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करून देते.
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या
या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहिण-भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती ....
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती.....
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती.....
बंधन असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी........
तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे
रक्षाबंधन रोजच यावा हा सण..
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ( Raksha Bandhan Wishes In Marathi )

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा....
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम
आठवण करून देत राहील...
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला
सामोरे जावे लागेल...
आई- बहीण मुलगी सगळी रुप आहेत
तुझ्यात सामावले आहे
माझे विश्व आणि तुझ्यावरच
माझा सगळा विश्वास
सगळा आनंद,सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं,
सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे...
राखी... एक प्रेमाचं प्रतिक आहे राखी.. ...
एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ..
आजचा दिवस खूप खास आहे..
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी
काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या
गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Chya hardik shubhechha

रक्षाबंधन निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला. वाहत राहो
निखळपणे, शुभेच्छ बहिण-भावला…
राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे
बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात,
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास....
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो.....
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई
मला दिला मोठा आधार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय...हरवलेले ते गोड दिवस,
त्यांच्या मधुर आठवणी आज सारं सारं
आठवलंय ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय....
रक्षाबंधनाचा सण हा आला ताई दादाच्या
आठवणी जाग्या झाल्या, एका राखीत सर्व काही
सामाव बहीण भावाचे प्रेम जगावेगळे....
Raksha Bandhan Wishes In Marathi | राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

हातावर राखी बांधून आज
तू दे मला वचन जगाच्या पाठीवर
कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या
हातावर बांधलेल्या राखीला जागून
भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह, प्रेम,
नाते वृध्दिंगत होते..आपणास
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधन...भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता नात्याची असो वा मानलेली.
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय...
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी....
आज सारं सारं आठवले....
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले...
बंध हे प्रेमाचे नाते आहे....ताई तुझ आणि
माझ नातं जन्मोजन्माचे आहे..
चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ
बहीनीचं प्रेम म्हणजे.. रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधन कोट्स मराठी | Raksha Bandhan Quotes In Marathi

रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ...
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवाभावाचा भाऊ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून
कधीच जाणार नाही.
थोडी लढणारी, थोडी भांडणारी, थोडी चिडणारी,
थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी
एक बहीण असते.तीच तर राखी
पौर्णिमेची खरी शान असते...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
लहानपणीच्या राखी मी आजही
जपून ठेवल्या आहेत...
या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि
माझी आठवण जोडली आहे.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून
रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश ( Raksha Bandhan Messages In Marathi )

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल...
Happy Rakshabandhan दादा !
ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण
गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो,
फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी
तर रक्षाबंधनाचा सण आहे...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आतापर्यंत आपण कितीतरी
रक्षाबंधन एकत्र केलेत
त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी
आजही जपून ठेवलयं.
राखी नाही एक दोरा आहे ते
आपले अतुट बंधन..
येतोयस ना दादा... आज आहे रक्षाबंधन
ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
Raksha Bandhan Quotes In Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

माझ्यावर संकट येऊ नये
म्हणून देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले....
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
किती वाट पाहायला लागली
तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला
माझा रक्षण करणारा
भाऊराया,रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…
ना तोफ ना तलवार
मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
लहानपणी तुझ्या कितीतरी
चुकांचा फटका मी खाल्ला आहे
कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे.
आईने दिला जन्म..
पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच
तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून
कधीच जाणार नाही.
एक भाऊ असला तरी मिळते
एक समधान.. सोबत असल्याचा तो
असतो एक विश्वास
लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर
आपण एकमेकांचे मित्र असतो.
पण ते खरेच आहे कारण
भांडण फक्त दिखावा असतो.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई
आपल्या बहिणीसारखी
दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण
बहीण नाही त्याचं आज दुःख कळतंय,
हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.
बहीण भावाचे नाते दृढ करते
हा एक धागा.... सगळ्यांना
रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
लहान बहिणीसारखी चांगली
गोष्ट आयुष्यात असू शकत नाही.
बहिणी तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
राखीचा सण आला आनंदाचा...
बहीण भावासोबत एकत्र साजरा करण्याचा,
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
राखी बांधल्यानंतर प्रत्येक
भावाची छाती 56 इंचाची होते.
कारण जगातली ती सगळ्यात
मोठी जबाबदारी असते.
इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते.
पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.
बहीण भावासाठी हा दिवस
असतो फारच खास...
होतो एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव
हातातील राखी म्हणजे
प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान,
आपल्या बहिणीला जपण्याचे
नातं तुझं माझं अगदी या राखीसारखं...
कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा | Raksha Bandhan Wishes In Marathi for sister |
गोंड्याची ना शोभेची
मला हवी माझ्या बहिणीच्या
प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
भावाच्या हातावर राखी
बांधून मिळते एक समाधान...
सोबत असल्याचा असतो तो एक विश्वास
लहानपणी राखी बांधायला आवडायची नाही.
आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही.
यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो
तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले,
तुझी गेल्यावर्षीची राखी आजही
माझ्या हातात आहे.
राखी प्रेमाचं प्रतीक,
राखी प्रेमाचा विश्वास,
तुझ्या रक्षणासाठी मी सदैव
असेन हा विश्वास
ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील..
तुझी राखी मला माझी कायम आठवण करून देत राही
येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस.
तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का
वाट पाहायला लावतेस.
ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
आधार तू माझा,
मी तुझा विश्वास
येतेस ना ताई
मला फक्त तुझीच वाट,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Chya hardik shubhechha
कधीच कोणाला घेऊ देणार नाही.
राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.
दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.
राखी म्हणजे नुसता दोरा नाही.
तर आहे एक अतुट विश्वास..
कधी येतोयस भाऊराया आता
मला फक्त तुझीच आस
राखी हा धागा नाही नुसता,
हा विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही
वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार
हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा
लहानपणी चांगली राखी आणली नाही
म्हणून पटकन चिडायचास..
आता मात्र राखी पाहिल्यावर (मला)
डोळ्यात पाणी येतं
कोणती राखी तुझ्यासाठी निवडू
असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही
राखी आणली तरी तू तुझे काम अगदी
जबाबदारीने पार पाडतोस.
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.
0 Comments: